*जिल्ह्यात युवक राष्ट्रवादी काँग्रेस अधिक क्रियाशील झाल्याचे चित्र*
तिरोडा : आज कृषी उत्पन्न बाजार समिती, तिरोडा येथे युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बळकटीकरणासाठी व पक्षाचा जनाधार वाढविण्याच्या उद्देशाने महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. ही बैठक जिल्हाध्यक्ष श्री. प्रेमकुमार रहांगडाले, युवक जिल्हाध्यक्ष श्री. केतन तुरकर व प्रदेश उपाध्यक्षा सौ. राजलक्षी तुरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
यावेळी युवक जिल्हाध्यक्ष श्री. केतन तुरकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आदरणीय खासदार श्री. प्रफुल पटेलजी यांच्या प्रयत्नांतून अदानीसारख्या औद्योगिक प्रकल्पांच्या माध्यमातून युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. तसेच धापेवाडा सिंचन योजनेमुळे शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळत असून शेतीला मोठा आधार मिळाला आहे.
खासदार श्री प्रफुल पटेलजी व खासदार श्री. राजेंद्रजी जैन यांच्या नेतृत्वाखाली युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. युवकांना पक्षाच्या विचारधारेशी जोडून त्यांना संघटनात्मक कार्यात सक्रिय सहभागी करून घेणे, तसेच ग्रामीण व शहरी भागांत पक्षाचा जनाधार वाढविण्यासाठी आपल्या सर्वांच्या प्रयत्न गरजेचे आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
सर्वश्री प्रेमभाऊ रहांगडाले, केतन तुरकर, राजलक्ष्मी तुरकर, डाँ अविनाश जायस्वाल, जगदीश (बालू ) बावन्थडे, किरण पारधी, रामसागर धावळे, राज शुक्ला, अनिल भगत, किशोर पारधी, विजय बन्सोड, देवेंद्र चौधरी, किरण बन्सोड, पवन पटले, आशिष चौधरी, राहुल गहरवार, दुर्गेश कडपाते, खुमेश राहंगडाले, डॉ संदीप मेश्राम सहित मोठ्या संख्येने पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.







