गोंदिया व भंडारा जिल्ह्यासह पूर्व विदर्भात धान शेती केली जाते. सद्या खरीप हंगाम अंतिम टप्प्यावर आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही देत असलेल्या खा. श्री प्रफुल पटेल हे पुन्हा शेतकऱ्यांसाठी धावून आले असून दिवाळीपूर्वी आधारभूत धान खरेदी केंद्रे सुरू होणार असल्याची जाणकारी जिल्हा पणन अधिकारी यांनी दिली आहे.
खरीप हंगामातील अल्प कालावधीच्या धानाची मळणी प्रक्रिया सुरू झाली असून आधारभूत केंद्रावरील धान खरेदी प्रक्रिया मार्गी लावण्यासाठी खा. प्रफुल पटेल यांनी काही दिवसापूर्वी माननीय मंत्री महोदय श्री छगन भुजबळजी यांच्या दालनात पणन विभागाच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीत पाठपुरावा केला होता. त्याचे फलित म्हणजे पणन विभागाने मार्केटीग फेडरेशनच्या अभिकर्तां संस्थांना धान खरेदी करण्याच्या सूचना केल्या आहेत. परिणामी भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील धान खरेदी केंद्र लवकरच सुरु करण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतकरी खरीप हंगामातील धान विक्री पासून चिंता मुक्त झाले आहे. खा. प्रफुल पटेल यांच्या पाठपुराव्याचे फलित असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून त्यांचे आभार मानले जात आहे.
……………………………..
*शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नोंदणी करून केंद्रावरच धान विक्री करावी – खा. राजेंद्र जैन*
खा.प्रफुल पटेल यांच्या पाठपुराव्यामुळे धान खरेदीला सुरुवात होणार असून येत्या सोमवार पासून आधारभूत केंद्रावर खरेदीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे असल्याचे पणन विभागाचे पत्र निर्गमित झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी त्वरित नोंदणी करावी जेणे करून शेतकऱ्यांना लाभ घेता येईल असे आवाहन खासदार श्री राजेंद्र जैन यांनी केले आहे.








