आधारभूत खरेदी केंद्र लवकर चालू करण्याच्या सूचना
नागपूर विभागातील किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत सर्व शासकीय व सहकारी धान खरेदी केंद्रांच्या अडचणींबाबत व सीएमआर भरडाई व साठवणुक तसेच शेतकऱ्यांच्या समस्या व विविध विषयांवर अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालय, मुंबई येथे माननीय मंत्री महोदय छगन भुजबळजी यांच्या दालनात बैठक संपन्न झाली या बैठकीला खासदार श्री प्रफुल पटेलजी उपस्थित होते.
खासदार श्री प्रफुल पटेलजी यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध मुद्यांवर चर्चा केली यावेळी त्यांनी गोंदिया – भंडारा जिल्ह्यातील संकटात सापडलेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याबाबत नेहमीच बोनस देण्याकरिता शासनाकडे पाठपुरावा केला आहे. धानाला बोनस देण्याबाबत विधानसभा अधिवेशनात सुद्धा शासनाच्या वतीने आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना बोनस मिळावा याकरिता या विभागातील सर्व लोकप्रतिनिधी आपण माननीय मुख्यमंत्री महोदय यांना भेटून बोनस करिता आग्रह करू असे खा.प्रफुल पटेलजी म्हणाले पुढे त्यांनी दिवाळी पूर्वी शासकीय धान खरेदी केंद्र त्वरित सुरु करून भरडाई केलेल्या शेतकऱ्यांच्या धानाची उचल करावी. शेतकऱ्यांची ई पीक नोंदणी करून धान खरेदीला अडचण येणार नाही यासाठी यंत्रणेने सतर्कतेने काम करावे. भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास मंडळ (TDC) द्वारा खरेदी केलेल्या २००१ ते २०१४ पर्यतचे प्रलंबित कमिशन त्वरित देण्यात यावे. शासकीय धान खरेदी केंद्र तसेच धान खरेदी करणाऱ्या संस्थांच्या तांत्रिक व भौतिक अडचणी यासह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर खासदार श्री प्रफुल पटेलजी यांनी चर्चा केली.
या बैठकीला खासदार श्री राजेंद्र जैन यांनी ऑनलाईन हजर होऊन मंत्री महोदयांना निदर्शनास आणून दिले की नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमुक्ती योजनेचा लाभ त्वरित देण्यात यावा अशी मागणी यावेळी त्यांनी केल. तसेच BEAM पोर्टल च्यामाध्यमातून शेतकऱ्यांची नोंदनी केली जाते परंतु सदर पोर्टल बंद असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे BEAM पोर्टल सुरु करण्यात यावे. तसेच साठवणूक करिता गोदामांची क्षमता कमी असल्याने ७० टक्के धान उघड्यावर राहते त्यामूळे गोदामांची संख्या वाढविण्यात यावी तसेच गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील धान खरेदी केंद्र त्वरित चालू करण्याची संबंधी चर्चा केली. यावेळी आमदार श्री राजकुमार बडोले, आमदार राजूभाऊ कारेमोरे व विदर्भातील जनप्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते







