गीताचार्य तुकाराम दादा महाविद्यालय लाखांदूर येथे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी करण्यात आले. सदर कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गजभिये प्राध्यापक दिवटे सर प्राध्यापक नाकाडे सर प्राध्यापक मैंद सर , गजभिये सर उपस्थित होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावर नाकाडे सरांनी प्रकाश टाकला. प्रा हरिकृष्ण दिवठे सर यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.कार्यक्रमाचे संचालन भुषण तावेडे सरांनी केले,तर आभार प्रदर्शन योगेश गोस्वामी बाबूजींनी केले.








