लाखांदूर : जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त आज, २५ सप्टेंबर रोजी लाखांदूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने ग्रामीण रुग्णालय, लाखांदूर येथे सामाजिक सेवा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत रुग्णांना फळे व बिस्किटांचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली.या उपक्रमात तालुक्यातील केमिस्ट बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
तसेच ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व कर्मचारीवर्गानेही उपस्थित राहून या सामाजिक उपक्रमाला सहकार्य केले.रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेत औषधसेवेबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या लाखांदूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांचे यावेळी मनःपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी सर्वश्री देवानंद नागदेवे , बबलू नागमोती, नितीन जिभकाटे, कल्पेश आसई, सुशील वालदे, ज्ञानेश धाकडे, राजेश वासनिक, संदीप मेश्राम, राजेश भुरले, गजेंद्र हटवार, रवींद्र वैद्य उपस्थित होते.







