भंडारा: – जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सिरसोली येथे कार्यरत पदवीधर शिक्षक कैलास बुध्दे यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विद्यार्थीहिताच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना औदुंबर सामाजिक, शैक्षणिक संस्था, नागपूर आणि शिक्षण विभाग नागपूर यांच्या वतीने राज्यस्तरीय गुरुरत्न शिक्षक पुरस्कार’ दिनांक 13 सप्टेंबर रोजी वसंतराव देशपांडे सभागृह नागपूर येथे आयोजित भव्य, दिमाखदार सोहळ्यात माजी आमदार सुधाकर कोहळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.यावेळी मंचावर आ.विकास ठाकरे,सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ जोध,हरीश अरोरा,डॉ शरद देशमुख, उपशिक्षणाधिकारी रमेश हरडे,अजय अग्रवाल, रा. का. शहर अध्यक्ष अनिल अहिरकर,डॉ, स्मिता वंजारी,डॉ प्रा.पितांबर उरकुडे,भाजप शिक्षक आघाडी विदर्भ संयोजक अनिल शिवणकर आदी मान्यवर मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
राज्यभरातील 200 शिक्षकांमधून जीवन गौरव,मुख्याध्यापक,जिल्हा परिषद शाळा,खाजगी अनुदानित शाळा, विनाअनुदानित शाळा,कला,क्रीडा,अपंग या संवर्गांमधून फक्त 30 शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. सदर निवड 30 आग रोजी ऑनलाईन व ऑफलाईन मुलखात घेऊन करण्यात आली.श्री कैलास बुध्दे यांची निवड जिल्हा परिषद शाळा या संवर्गांमधून करण्यात आली.त्यांना शाल,श्रीफळ, स्मृतिचिन्ह,प्रमाणपत्र,मनाचा दुपट्टा आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. शाळेच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसोबतच डिजिटल शिक्षण,नाविन्यपूर्ण उपक्रम, पर्यावरण संवर्धन,वृक्षारोपण,स्वच्छता,तंबाखुमुक्त शाळेतसच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकी द्यान न देता कृतीतून आणि अनुभवातून शिकण्याची संधी देण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. त्यांच्या याच कार्याची दखल घेत यापूर्वीही त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.जिल्हा परिषद भंडारा यांनीही त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केलेले आहे. त्यांच्या या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी शरद कुकडकर,विस्तार अधिकारी विजय आदमने,केंद्रप्रमुख चिंतामण बावनकुळे,संस्थेच्या सचिव भाग्यश्री पवार,मनोज कुंभारे,चंद्रप्रकाश चतुर्वेदी,माधुरी पालीवाल यांनीही अभिनंदन केले.
श्री बुध्दे यांनी हा पुरस्कार त्यांचे कुटुंबीय,मोलाची साथ देणारे त्यांचे सहकारी शिक्षक,आणि ज्यांच्यामुळे हा पुरस्कार मिळाला ते विद्यार्थी यांना समर्पित केले.








