लाखांदूर: स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय मासळ येथे दिनांक 5 सप्टेंबर 2026 रोज शनिवारला शिक्षक दिन म्हणून डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती साजरी करण्यात आली सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष आर.पी. मेश्राम सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे न.बा. गजभीये सर ,पिलेवान सर,नरेश जनबंधू सर उपस्थित होते.
माननीय अध्यक्ष महोदयांनी सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावर प्रकाश टाकला कार्यक्रमाचे संचालन आशिकातुलकर यांनी केले तर प्रास्ताविक नरेश जनबंधू यांनी केले आपल्या प्रास्ताविक भाषणातून आजचा विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या जीवनावर प्रकाश टाकला आणि आभार प्रदर्शन पिलेवान सर यांनी केले आणि कार्यक्रमाची सांगता झाली. विद्यार्थ्यांना त्यानंतर अल्पोपहार देण्यात आला








