*उत्साह उमंग, जल्लोषाचा बाल गोपालांचा पर्व म्हणजे तान्हा पोळा*
पवनी: पवनी तालुक्यातील मौजा पिंपळगाव (निपाणी)येथे “तान्हा पोळा”सरपंच रेखा मोहरकर यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच अतुल कुर्झेकर, पोलीस पाटील भागवत भिवगडे, ग्राम पंचायत सदस्य रुपेश जिभकाटे, शालिकराम जिभकाटे, प्रियंका वाटेकर, संगिता पंचभाई, वैशाली येळणे आदि मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. उत्साह उमंग, जल्लोषाचा बाल गोपालांचा पर्व म्हणजे तान्हा पोळा या पर्वात बाल गोपालांनी हिरहिरीने भाग घेतला, यात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या स्पर्धकांना वस्तुरुपाने बक्षिसे देण्यात आली.यावेळी विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद पंचभाई व आभारप्रदर्शन विलास येळणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष प्रकाश जिभकाटे, श्रीराम गाडेकर, रामभाऊ गाडेकर व योगेश मरघडे यांनी परिश्रम घेतले.








