नरेश गजभिये प्रतिनिधी
लाखांदूर – स्थानिक नगरपंचायतीचे नगराध्यक्ष विनोद शंकरराव ठाकरे यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या उत्कृष्ट कार्यपद्धतीची, सामाजिक बांधिलकीची आणि शहराच्या विकासासाठी असलेल्या धडपडीची दखल घेत प्रसिद्ध ‘लोकमत’ समूहातर्फे त्यांना या वर्षीचा ‘ *उत्कृष्ट नगराध्यक्ष* ’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्कारामुळे लाखांदूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
*दिल्ली-मुंबईत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व*
विनोद ठाकरे यांनी आपल्या कामाचा ठसा केवळ स्थानिक पातळीवरच नाही, तर राष्ट्रीय पातळीवरही उमटवला आहे. भारत सरकारच्या १६ व्या वित्त आयोगाच्या नियोजनात व त्यातील तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी दिल्ली आणि मुंबई येथील महत्त्वाच्या बैठकांमध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी मांडलेले मुद्दे प्रशासकीय पातळीवर अत्यंत महत्त्वाचे ठरले आहेत.
*गोरगरिबांचे कैवारी: संजय गांधी निराधार योजना*
*नगराध्यक्ष पदापूर्वी त्यांनी संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली होती. या काळात त्यांनी अत्यंत पारदर्शक आणि संवेदनशीलपणे काम करत तालुक्यातील हजारो गरजू, वृद्ध, विधवा आणि दिव्यांग लाभार्थ्यांना या योजनेचा थेट लाभ मिळवून दिला. त्यांच्या या कामामुळे अनेक उपेक्षित कुटुंबांना हक्काचा आर्थिक आधार मिळाला.
*शहराचा कायापालट आणि विकासकामांचा धडाका*
लाखांदूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर विनोद ठाकरे यांनी शहराच्या मूलभूत सुविधांवर विशेष लक्ष केंद्रित केले.पायाभूत सुविधा – शहरातील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण व कॉंक्रिटीकरण करणे, पाण्याचा निचरा होण्यासाठी सुनियोजित नाल्यांची निर्मिती करणे. **पिण्याच्या पाण्याची सोय:* नागरिकांना शुद्ध आणि पुरेसे पिण्याचे पाणी मिळावे यासाठी त्यांनी पाणीपुरवठा योजना अधिक सक्षम केली.
*विद्यार्थ्यांसाठी डिजिटल वाचनालय ठरले ‘टर्निंग पॉईंट’*
ठाकरे यांच्या सरपंच असताना च्या उभारलेले वाचनालय आता त्यांच्या अध्यक्ष पदाच्या कार्यकाळात कौतुकास्पद पाऊल म्हणजे त्यांनी विद्यार्थ्यांसाठी उभारलेले *सुसज्ज व अद्ययावत वाचनालय (Library)* होय. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरात जाण्याची गरज पडू नये, यासाठी त्यांनी सर्व सोयींनी युक्त अभ्यासिका सुरू केली. या वाचनालयाचा फायदा घेऊन आजपर्यंत लाखांदूर व परिसरातील असंख्य विद्यार्थ्यांनी शासकीय नोकऱ्या मिळवत आपल्या पायावर उभे राहण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. जनसामान्यांशी असलेली नाळ आणि विकासाची दूरदृष्टी यांमुळेच विनोद ठाकरे आज लोकप्रिय लोकप्रतिनिधी म्हणून उदयास आले आहेत. लोकमत समूहाचा हा पुरस्कार त्यांच्या याच अविरत सेवेचा आणि लोककल्याणकारी कार्याचा गौरव करणारा ठरला आहे.
*मिळालेला पुरस्कार हा मलाच नव्हे तर माझ्यासारख्या असंख्य नगराध्यक्ष आणि भावी अध्यक्षांना प्रेरणादायी ठरेल – नगराध्यक्ष विनोद शंकरराव ठाकरे लाखांदूर*








