गोंदिया | प्रतिनिधी
आज खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या जनसंपर्क कार्यालय, पाल चौक, गोंदिया येथे खासदार श्री राजेंद्र जैन यांची गोंदिया शहरातील स्वस्त धान्य दुकानदारांनी भेट घेऊन आपल्या विविध प्रलंबित समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली.
यावेळी दुकानदारांनी राशन कार्ड अपडेटची समस्या, दुकानदारांचे कमिशन, शासनाकडून होणारा धान्य पुरवठा, वाढत्या लाभार्थ्यांच्या तुलनेत उपलब्ध कोटा अपुरा पडणे, तसेच राशन कार्ड अद्ययावतीकरणासह इतर प्रशासकीय अडचणी खासदारांच्या निदर्शनास आणून दिल्या.
खासदार श्री राजेंद्र जैन यांनी दुकानदारांच्या समस्या ऐकून घेत तातडीने जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याशी संपर्क साधला. संबंधित समस्या प्राधान्याने निकाली काढण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच, शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येइल, असे आश्वासन त्यांनी दुकानदारांना दिले.
यावेळी स्वस्त धान्य दुकानदारांच्या वतीने नव निर्वाचित खासदार श्री राजेंद्र जैन यांचे शाल व श्रीफळ देवून सत्कार करून अभिनंदन केले.








