प्रतिनिधी
गोंदिया – राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंती निमित्त जनसेवा सप्ताह २२ ते २८ जुलै २०२६ या दरम्यान जनसेवेचे व लोकोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन खासदार श्री प्रफूल पटेलजी व खासदार श्री राजेंद्र जैनजी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले आहे. दिनांक २२ जुलै सकाळी १०.०० वाजता राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी कार्यालय येथे स्व.अजितदादा पवार अभिवादन व जयंती कार्यक्रम व ज्येष्ठ नागरिक सत्कार कार्यक्रम, १०.०० वाजता जि.प.माध्यमिक स्कुल कटंगी येथे चित्रकला स्पर्धा, १०.०० वाजता रजेगाव येथे आरोग्य तपासणी, सकाळी ११.०० वाजता गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँक, सकाळी ११.०० वाजता विमलताई स्कुल कटंगी विजय नगर येथे पर्यावरण या विषयावर निबंध स्पर्धा, ११.०० वाजता संस्कार स्कुल, हरीकाशी नगर, आरोग्य तपासणी शिबीर, तसेच कुडवा वार्ड न.५ दुर्गा मंदीरजवळ वृक्षारोपण, वृक्षधरा फाउंडेशन, ११.०० वाजता भारतीय जि.प.स्कुल, एकोडी येथे वृक्षरोपण व व्याख्यान (नविन तंत्र), ११.३० वाजता जि.प.शाळा, कुडवा चित्रकला स्पर्धा, दिनांक २३ जुलै ला सकाळी ०९.०० वाजता वैभव लॉन,कुडवा रोड, गोंदिया येथे आरोग्य तपासणी शिबीर, ११.०० वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळा, कुंभारे नगर येथे वृक्षारोपण, दिनांक २४ जुलै ला सकाळी १०.०० वाजता प.पू.डॉ.बाबासाहेब आंबेडकर हॉल, मरारटोली येथे आरोग्य तपासणी शिबीर, ११.३० वाजता उपकेन्द्र इमारत उद्घाटन व नेत्र व आरोग्य शिबीर धामनेवाडा येथे नेत्र व आरोग्य शिबीर, ११.०० वाजता उपकेंद्र, कटंगीकला येथे आरोग्य तपासणी शिबीर १२.३० वाजता दुर्गा चौक, नागपूर मुर्री येथे रक्तदान शिबीर, दिनांक २५ जुलै सकाळी ०९.०० वाजता जी.ई.एस. हायस्कुल,रावणवाडी आरोग्य तपासणी व वृक्षारोपण, ०९.०० वाजता जि.प.क्षेत्र एकोडी मधील सर्व शाळामध्ये निबंध स्पर्धा/चित्रकला स्पर्धा, ११.०० वाजता दासगांव जी.ई.एस. हायस्कुल येथे वृक्षारोपण,११.०० वाजता जी.ई.एस.हायस्कुल, कामठा येथे वृक्षारोपण व आरोग्य तपासणी, दिनांक २६ जुलै सकाळी ११.०० वाजता जि.प.शाळा ग्राम खमारी येथे वृक्षारोपण,११.३० वाजता एम.आय.ई.टी.कॉलेज येथे वृक्षारोपण दिनांक २७ जुलै सकाळी ११.०० वाजता हनुमानटोली,जुनेवानी, पैकाटोला,शंकरटोली पाठ्य पुस्तक व साहित्य वाटप दिनांक २८ जुलै ११.०० वाजता आरोग्य तपासणी व जेष्ठ नागरिक सत्कार आयोजन करण्यात आले आहे.








