प्रतिनिधी
नरेश गजभिये
लाखांदूर :- बहुजन प्रबोधन मंच, लाखांदूरने महाराष्ट्र शासनाला तहसीलदार, लाखांदूर यांचे मार्फत निवेदन पाठवून शासनाने प्रशासकीय इमारत, लाखांदूर” चा ” भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशासकीय इमारत, लाखांदूर” असा नामविस्तार करण्याची मागणी केली आहे.सविस्तर असे की, दिवंगत नामदेवराव दिवठे, लाखांदूर यांनी 1985-95 या कालावधीत लाखांदूर विधानसभा क्षेत्राचे तसेच 1996-98 व 1999-2004 पर्यंत चिमूर लोकसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व केले होते आणि दि.18-07-2015 मृत्यू पावलेत.महाराष्ट्र शासनाने लाखांदूर येथे सुरू असलेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा “नामदेवराव दिवठे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लाखांदूर” असा नामविस्तार करून मान. डॉ. प्रशांत पडोळे, सदस्य, लोकसभा, भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्र व मान. नानाभाऊ पटोले, सदस्य, विधानसभा, साकोली विधानसभा क्षेत्र यांच्या शुभहस्ते मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत दि.15 एप्रिल, 2025 ला नामफलकाचे अनावरण करून दिवंगत नामदेवराव दिवठे यांचा सन्मान केला.
महाराष्ट्र शासनाने बांधलेल्या तहसील कार्यालय लाखांदूरच्या नविन इमारतीवर “प्रशासकीय इमारत, लाखांदूर” असे नाव लिहून मान.डाॅ.पंकज भोयर, राज्यमंत्री,गृह(ग्रामीण) तथा पालकमंत्री, भंडारा व वर्धा यांच्या अध्यक्षतेखाली व मान.नामदार श्री चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री तथा पालकमंत्री, नागपूर व अमरावती यांच्या शुभहस्ते मान्यवर पदाधिकारी व कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने जमलेल्या जनतेच्या उपस्थितीत दि.14 एप्रिल,2026 ला इमारतीचे लोकार्पण केले.वरील दोन्ही महत्वपूर्ण कार्य केल्याबद्दल बहुजन प्रबोधन मंच, लाखांदूरने महाराष्ट्र शासनाला मन:पूर्वक धन्यवाद दिले.14 एप्रिल 2026 हा दिवस घटनाकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा 136 वा जयंती दिवस असल्याने मान्यवर पाहुण्यांनी आपल्या भाषणातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय कार्याचा तसेच मूलभूत हक्क आणि जनकल्याणासाठी त्यांनी संविधानात केलेल्या तरतुदीचा मुक्त कंठाने गौरव करून उपस्थित जनसमुदायाला प्रबोधित केल्यामुळे खालील मागणी केली.”प्रशासकीय इमारत, लाखांदूर” या नावाचा “भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रशासकीय इमारत, लाखांदूर” असा नामविस्तार करून त्यांच्या प्रती महाराष्ट्र शासनाने आपला आदर व्यक्त करावा, ही मागणी बप्रमंला, नगरपंचायत लाखांदूरचे सर्व पदाधिकारी, जि.प.भंडाराचे सदस्य, कृ.उ.बा.समितीचे सभापती.पं.स.चे सदस्य, डॉक्टर्स, इंजिनिअर, वकील, प्राध्यापक,मुख्याध्यापक,शिक्षक तसेच तालुक्यातील जनतेनी निवेदनातून केली आहे.
मान.राज्यपाल,मान.मुख्यमंत्री,मान.सामाजिक न्याय मंत्री,मान.महसूल मंत्री,मान.राज्यमंत्री गृह (ग्रामीण) तथा पालकमंत्री भंडारा,मान.मुख्य सचिव,मान.जिल्हाधिकारी,मान.पोलीस अधिक्षक, भंडारा, मान.नानाभाऊ पटोले,आमदार, मान.परिणय फुके, आमदार, मान.आमदार अविनाश ब्राह्मणकर, आमदार, आणि मान.डाॅ.प्रशांत पडोळे,खासदार या मान्यवरांना मान.वैभव पवार, तहसीलदार, यांचेमार्फत निवेदन 13-07-2026ला पाठविले असल्याचे बप्रमंलाचे अध्यक्ष अनिल कारूजी काणेकर, लाखांदूर यांनी कळविले आहे.








