गोंदिया – पूज्य श्रीराम ज्ञानीराम महात्यागी महाराज तिरखेडी (ता. सालेकसा) यांनी पाल चौक, गोंदिया येथील खासदार श्री प्रफुल पटेलजी यांचे जनसंपर्क कार्यालयातील सदिच्छा भेटी दरम्यान नवनिर्वाचित राज्यसभा खासदार श्री राजेंद्र जैन यांनी स्वागत करून आशीर्वाद घेतला.
यावेळी महात्यागी महाराज यांनी खासदार श्री राजेंद्र जैन यांचे अभिनंदन करून त्यांना आशीर्वाद दिले. समाजसेवा, जनकल्याण आणि विकासकामांमध्ये यश लाभावे तसेच उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि लोकहिताची सेवा करण्यासाठी ईश्वर कृपा लाभो, अशा शुभेच्छा त्यांनी व्यक्त केल्या.








