*परिसरातील नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करताच नुकसान भरपाई करण्याचे प्रशासनाला दिले थेट निर्देश*
अर्जुनी मोरगाव:दिनांक २९ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील वडेगाव बंद्या आणि पुष्पनगर व परिसराला गावांना जोरदार तडाखा बसला. या नैसर्गिक आपत्तीत अनेक घरांची पडझड झाली असून झाडे, विजेचे खांब/डीपी आणि शेतातील सोलर पॅनलचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे कर्तव्यदक्ष खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी तातडीने अधिवेशन वरून परतताच घटनास्थळी पोहोचून बाधित परिसराची पाहणी केली आणि पीडित ग्रामस्थांचे दु:ख जाणून घेतले.पाहणीदरम्यान ग्रामस्थांची झालेली दैना पाहून खासदार डॉ. प्रशांत पडोळे प्रशासनावर भडकले. त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना आणि जिल्हाधिकारी गोंदिया यांना तातडीने नुकसानीचे पंचनामे करून सर्व बाधितांना आर्थिक मदत देण्याचे थेट व स्पष्ट निर्देश दिले. तसेच ज्यांची घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत, त्यांना विलंब न करता शासकीय योजनेतून तातडीने ‘घरकुल’ मंजूर करण्याची आक्रमक मागणी केली. “एकही पीडित कुटुंब मदतीपासून वंचित राहता कामा नये, अन्यथा गाठ माझ्याशी आहे,” असा सज्जड इशाराही त्यांनी यावेळी दिला.
या पाहणी दौऱ्यात त्यांच्यासोबत माजी आमदार श्री. दिलीपजी बनसोड, काँग्रेस कमिटी अर्जुनी मोरगावचे तालुका अध्यक्ष श्री. घनश्यामजी धामट, किशोर शेंडे, फुलचंदजी बागडेरिया सदस्य, पं. स. अर्जुनी/मोर, घनश्यामजी शहारे सरपंच वडेगांव/बंध्या, प्रितमजी रामटेके, सुधीरजी घुटके, नरेंद्र लोथे, सरोज मेंढे, अरुण मस्के, मच्छिंद्र बोरकर, भोजराज निमकर तंटामुक्ती अध्यक्ष, चेतन ढेकाने पोलीस निरीक्षक केशोरी, बोरकर तलाठी, खुणे ग्रामपंचायत अधिकारी,स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने गावकरी नागरिक, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देत वादळग्रस्त गावकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.








