लाखांदूर : तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय दिघोरी/ मोठी यांची कृषी विभाग योजनेअंतर्गत क्षेत्र भेट दिनांक १०/०८/२०२६ रोज सोमवारला बोंडगाव/देवी, नवेगावबांध, विविध कृषी विभाग स्थळ,रोपवाटिकेला परिसर अभ्यास दौरा अंतर्गत भेट देण्यात आली.
सर्व विद्यार्थ्यांना रोपवाटिकेमध्ये असलेल्या विविध वृक्षांची माहिती,उपाय व मार्गदर्शन याप्रसंगी करण्यात आले. यावेळी कृषी शिक्षक पंकज हुमे सर, मान. शरद साळवे सर, मार्गदर्शक मान.एस.ए.घुगे सर लागवड अधिकारी अर्जुनी/मो यांनी सर्व विद्यार्थी यांना विविध उपक्रम, वृक्ष लागवड याविषयी मार्गदर्शन केले. ही क्षेत्रभेट अतिशय सुंदर अशा वातावरणात सर्व विद्यार्थी यांच्या उपस्थितीमध्ये अतिशय आनंदपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाली या क्षेत्रभेटीसाठी मार्गदर्शक सन्माननीय मानकर सर जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय दिघोरी/ मोठी यांनी सर्व विद्यार्थ्यांना क्षेत्रभेटी करिता शुभेच्छा दिल्या.
या क्षेत्रभेटीत खिमांसू अवचट,मयूर फुंडे,अजय नैताम, तन्मय गोटेफोडे,रितेश देशमुख, सौरभ वामने,चेतन धकाते, चेतन हटवार, सुरज कांबळे, जयेंद्र करंजेकर, यश साळवे, हाशिम उपरीकर, भूषण आंबेकर सर्व विद्यार्थी शंतनु गाभने प्रामुख्याने उपस्थित होते.








