माजी गटनेते *रामचंद्र राऊत* यांच्या निवासस्थानी मान्यवरांची उपस्थिती
लाखांदूर:इस्लाम धर्माचे शेवटचे पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिवसानिमित्त साजरा होणारा ‘ईद-ए-मिलाद-उन-नबी’ हा सण लाखांदूर तालुक्यात मोठ्या उत्साहात आणि सर्वधर्मसमभावाच्या भावनेने साजरा करण्यात आला. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या *”सभी धर्म अरूपंथ पक्ष को दिल से रहे प्यारा, विजयी हो, विजयी हो, विजयी हो, भारत देशा हमारा”* या संदेशाला कृतीत आणत, लाखांदूर येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या पवित्र पर्वाचे औचित्य साधून *श्री गुरुदेव सेवा मंडळ* तथा *रामचंद्र राऊत मित्र परिवाराच्या* वतीने लाखांदूर नगरपंचायतचे माजी गटनेते तथा खरेदी विक्री संस्थेचे संचालक माननीय रामचंद्रजी राऊत यांच्या निवासस्थानी सकाळी ८:३० वाजता भव्य अल्पोपहार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून तालुक्यातील विविध धर्माच्या नागरिकांनी एकत्र येत सामाजिक सलोख्याचे आणि एकतेचे दर्शन घडवले.या प्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री गुरुदेव सेवा मंडळ तालुका लाखांदूरचे उपाध्यक्ष मा. गोविंदराव भूरले उपस्थित होते. तर लाखांदूर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मा. विनोद ठाकरे माननीय शिरीष भालेराव पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन लाखांदूर,श्री. योगेश कुटे सचिव गुरुदेव सेवा मंडळ राजूजी पठाण नगरसेवक, मुजीब भाई पठाण, रिजवान पठाण, मुजीब पठाण, निसार गुरुजी रहमतुल्ला मास्टर, मेहबूब टेलर मेह बूब इरफान पठाण, बाबा पठाण ,बबलू शेख ,सलीम शेख रफिक शेख मुस्लिम कमिटीअय्या शेख इक्बाल शेख हैदर पठाण बाबू शेख अनु पठाण सर, मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक रामचंद्रजी राऊत, सौ. ज्योती रामचंद्र राऊत, कु. वैभव राऊत आणि कु. सौरभ राऊत यांच्यासह श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोलाचे परिश्रम घेतले. या उपक्रमाचे संपूर्ण लाखांदूर तालुक्यात कौतुक होत असून, यामुळे तालुक्यातील धार्मिक सलोखा अधिक दृढ होण्यास मदत झाली आहे.








