पक्ष पदाधिकारी व कार्यकर्तांशी करणार चर्चा
गोंदिया: – खासदार श्री प्रफुल पटेलजी दोन दिवसीय दौऱ्यावर असून भंडारा व गोंदिया येथे विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. दिनांक 20 ऑगस्ट 2026 गुरुवारला दुपारी 1.00 ते 2.00 वाजता पर्यंत शासकीय विश्राम गृह, भंडारा येथे पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा व भेट, दिनांक 21 ऑगस्ट शुक्रवारला सकाळी 11.30 ते दुपारी 01.30 वाजता पर्यंत निवास स्थान, रामनगर, गोंदिया येथे पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा व भेटी करिता उपस्थित राहणार आहेत. वरील कार्यक्रम दरम्यान त्यांच्या सोबत खासदार श्री राजेंद्र जैन व वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार असून पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.








