गोंदिया : – प्रादेशिक पर्यटन विकास अंतर्गत खासदार श्री. प्रफुल पटेल यांच्या प्रयत्नांतून 30 लाख रुपयांच्या निधी मंजूर गोंदिया तालुक्यातील नागराधाम येथे प्राचीन काळापासून भगवान भोलेनाथाचे प्रसिद्ध व जागृत शिवमंदिर आहे. या ऐतिहासिक धार्मिक स्थळाच्या विकासासाठी खासदार श्री प्रफुल पटेल यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. याच विकासाच्या शृंखलेत प्रादेशिक पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत 30 लाख रुपयांच्या निधीतून नागरा पर्यटन स्थळ येथे भगवान भोलेनाथ मंदिरासमोरील परिसरात भाविकांसाठी शेडचे बांधकाम करण्यात आले आहे. या शेडमुळे मंदिरात येणाऱ्या भाविकांना ऊन, पाऊस यापासून संरक्षण मिळून त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध होणार आहेत. नागराधाम हे धार्मिक तसेच पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे स्थळ असून, या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या माध्यमातून विविध विकासकामांना चालना मिळत आहे. भाविकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच नागराधामचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्याच्या दृष्टीने हे काम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.









