प्रतिनिधी:
गोंदिया – खासदार श्री प्रफुल पटेल दोन दिवसीय भंडारा व गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून महायुतीच्या वतीने आयोजित नवनिर्वाचित खासदार राजेंद्र जैन व नवनिर्वाचित आमदार अविनाश ब्राह्मणकर यांच्या सत्कार समारंभाला दिनांक ११ जुलै शनिवारला, दुपारी ०१.०० वाजता, लक्ष्मी सभागृह, भंडारा (जे एम पटेल महाविद्यालय समोर) उपस्थित राहणार असून, दिनांक १२ जुलै २०२६ ला सकाळी ११ ते ०१ पर्यंत बगीचा रामनगर, निवास स्थान येथे पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता भेट व चर्चा करतील. यावेळी खासदार श्री राजेंद्र जैन व पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार असून वरील कार्यक्रमांना जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने केले आहे.








