लाखांदूर प्रतिनिधी
नरेश गजभिये
लाखांदूर : स्थानिक शिवाजी प्राथमिक शाळा येथे शाळेच्या वतीने आषाढी एकादशीचे अवचित्य साधून अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात आनंदवारी व आषाढी एकादशीच्या कार्यक्रम साजरा करण्यात आला शाळेचे मुख्याध्यापक इखारे सर यांच्या हस्ते विठ्ठल रुक्माई च्या प्रतिमेचे पूजन व पालखीचे पूजन करण्यात आले.
मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाची परंपरा आणि संत साहित्याचे महत्त्व समजावून सांगितले या निमित्त विद्यार्थ्यांनी पारंपारिक पोशाख धोती कुर्ता तुळशीची तुळशी वृंदावणे आणि टाळ परिधान करून दिंडी सोहळा काढण्यात आला ज्ञानबा तुकाराम आणि विठ्ठल विठ्ठल हरी ओम विठ्ठल जय जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या रिंगण सोहळा अभंग आणि फुगड्यांनी उपस्थित लोकांची मने जिंकले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंदांचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोडापे सरांनी केले दिंडी व्यवस्थापन व शिस्तीचे नियोजन मानापुरे सर सौ माकडे मॅडम यांनी सामान्य आभार प्रदर्शन प्रदर्शन यांनी मानले सोहळ्याला सौ चौधरी मॅडम नंदारासेकर लीना मॅडम सौ भुते मॅडम दिनेश दो नाडकर कुठे गावे ज्ञानेश्वर मोटघरे सुनील गडे महेंद्र कुडेगावे उपस्थित होते शेवटी विद्यार्थ्यांना फळे व खाऊचे वाटप करण्यात आले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली








