*हनुमान मंदिर व ग्रामपंचायत परिसरात लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांच्या सहभागातून हरित उपक्रम*
तिरोडा : स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त 22 ते 28 जुलै 2026 या कालावधीत *मा. खुमेंद्र (विक्कीभाऊ) रहांगडाले, मा.अध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, तिरोडा* यांच्या पुढाकारातून सुकडी जिल्हा परिषद क्षेत्रातील सर्व गावांमध्ये राबविण्यात येत असलेल्या भव्य वृक्षारोपण सप्ताहाच्या सहाव्या दिवशी भजेपार येथे विविध ठिकाणी उत्साहपूर्ण वातावरणात वृक्षारोपण करण्यात आले.
सर्वप्रथम हनुमान मंदिर परिसरात *मा. धानसिंगजी बघेले, माजी उपसभापती, पंचायत समिती तिरोडा* यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक, मंदिराचे पुजारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. धार्मिक स्थळी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाबरोबरच निसर्ग संरक्षणाचा संदेश देण्यात आला.त्यानंतर ग्रामपंचायत भजेपार कार्यालय परिसरात *मा. शिशुपालजी रहांगडाले, सरपंच, ग्रामपंचायत भजेपार* यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, कर्मचारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी वृक्षारोपण ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून भावी पिढ्यांसाठी हरित, स्वच्छ आणि समृद्ध पर्यावरण निर्माण करण्याची सामूहिक चळवळ असल्याचे सांगितले. प्रत्येक नागरिकाने एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहनही करण्यात आले.मा. खुमेंद्र (विक्कीभाऊ) रहांगडाले यांच्या प्रयत्नातून सुरू असलेल्या या वृक्षारोपण सप्ताहाला सुकडी जिल्हा परिषद क्षेत्रातील विविध गावांत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राबविण्यात येणारा हा पर्यावरणपूरक उपक्रम सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संरक्षणाचा प्रभावी संदेश देत आहे.








