*मुख्यमंत्री व महायुती सरकारचे खा.प्रफुल पटेल व खा.राजेंंद्र जैन यांनी मानले आभार*
गोंदिया: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत महायुती सरकारने शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ केले आहे तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान जाहीर केले. याचा लाभ राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना मिळाला असून शनिवारी दि.२५ जुलैला कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांच्या जिल्हानिहाय याद्या शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आल्या. यामुळे शेतकऱ्यांना आषाढी एकादशीच्या दिवशी कर्जमाफीची भेट दिली असून महायुती सरकारने शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत गोंदिया जिह्यातील राष्ट्रीयकृत बँका व सहकारी बँक तसेच खाजगी बँक मधील पात्र लाभार्थी २९,९९४ असून यापैकी मध्यवर्ती सहकारी बँकेचे २०,९१५ हजारावर शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ केले जाणार आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे. गोंदिया जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना १२७ कोटी ३३ लाख रुपयाची ही आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी असून माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दूरदृष्टीतून घेतलेला महत्वपुर्ण निर्णय आहे. कर्जमुक्तीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना नवीन बळ मिळाले आहे या निर्णयाची अंमलबजाणी होणार असून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार आहे त्यामुळे मुख्यमंत्री व महायुती सरकारचे खा.श्री प्रफुल पटेल व खा.श्री राजेंद्र जैन यांनी आभार मानले आहे.कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना पुन्हा जोमाने शेती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शनिवारी (दि.२५) कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर करण्यात आल्या असून आधारप्रमाणीकरणाची प्रक्रिया पुर्ण केल्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार आहे.यामुळे शेतकऱ्यांना नवीन पीक कर्जाची उचल करणे सोपे होणार आहे. महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या हितार्थ निर्णय कौतुकास्पद असून या निर्णयाने शेतकऱ्यांमध्ये आनंद आणि समाधानाचे वातावरण आहे.








