*विकासकामे व प्रलंबित विषयांवर सविस्तर सकारात्मक चर्चा*
प्रतिनिधी
गोंदिया – आज उपाध्यक्ष, गोंदिया जिल्हा परिषद यांच्या दालनात राज्यसभा खासदार श्री राजेंद्र जैन यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी जिल्हा परिषदेतील अनेक विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत विविध विकासकामे, प्रलंबित विषय, जिल्ह्याच्या प्रगतीसंदर्भातील विषय तसेच स्थानिक प्रश्नांवर सविस्तर व सकारात्मक चर्चा करण्यात आली. या प्रसंगी उपस्थितांनी खासदार श्री राजेंद्र जैन यांचे वृक्ष भेट देत स्वागत करून त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री सुरेश हर्षे, श्री केतन तुरकर, श्री अखिलेश सेठ, श्री केवल बघेले, श्री रवी पटले, श्री करण टेकाम, श्री राजू ठाकरे, श्री पंकज चौधरी, श्री सुरेंद्र रहंगडाले, श्री रघुपती अगडे, श्री सुनील पटले, श्री शैलेश वासनिक, श्री घनेश्वर तिरेले, श्री हितेश पतेह, श्री भूपेश गौतम सहित अन्य उपस्थित होते.








