लाखांदूर: जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय दिघोरी/मोठी येथे गुरुपौर्णिमा उत्सव दिनांक 29 जुलै 2026 रोज बुधवारला अतिशय आनंदात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मान.सुनील खंडाईत सर होते तर प्रमुख अतिथी म्हणून विज्ञान विभाग प्रमुख मान.मानकर सर, शरद आर.साळवे सर,प्रणय वाहाने सर, वरिष्ठ शिक्षक कोडापे सर, कुणाल गोटेफोडे सर, पंकज हुमे सर,चौधरी बाबूजी, कोरे ताई, खोडकरजी, सर्व शिक्षकवृंद प्रामुख्याने उपस्थित होते सर्वप्रथम पाहुण्यांनी माँ.सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्याअर्पण केले.त्यानंतर सर्व पाहुण्यांचे विद्यार्थ्यांनी- विद्यार्थ्यांतिनी यांनी आशीर्वाद घेऊन सत्कार,स्वागत केले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी असलेले शाळेचे प्राचार्य मान.सुनील खंडाईत सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की,जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर विद्यार्थ्यांनी नेहमी शिस्त आणि गुरूचा आदर, शिक्षकांनी दिलेलं मार्गदर्शन नेहमी आत्मसात करने अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले,त्याचप्रमाणे विज्ञान विभाग प्रमुख मानकर सर यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रत्येकांनी संघर्ष करून पुढे जावं लागते तसेच कठोर परिश्रम करून जीवनात यशस्वी होऊन जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय दिघोरी/ मोठीचे नाव लौकिक करावे अशी अपेक्षा व्यक्त करतांना म्हटले की आपल्या शाळेत वर्षभर विविध उपक्रम, कार्यक्रम राबविले जातात, विविध विषयात मार्गदर्शन करणारे अभ्यासक विद्यालयात येत असतात आणि आपल्या शाळेतील विद्यार्थी खूप मोठ्या पदावर जात आहेत.आपल्या विद्यालयाचा शैक्षणिक निकाल, दर्जा, शिक्षक कुठे ही तोड नाही.विज्ञान विभागात, क्रिडा विभागात राज्यस्तरावर आमचे विद्यार्थी जाऊन गावाचे, शाळेचे नाव लौकिक करीत आहेत याचा सर्व विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद आर.साळवे सर यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व विद्यार्थी- विद्यार्थिनी,शिक्षक, कर्मचारीवृंद यांनी सहकार्य केले.








